कशी होते ,काय होते, पब्लिसिटी तर होते!
तो म्हणेल काय, ती बोलेल काय?
ह्या विचारात ती रात्र काढेल काय?
ह्याच्या त्याच्या म्हणण्यावरती जग फिदा होते!
हाय!
पब्लिसिटीची ,पब्लिसिटी करण्या नवी विटी हवी
माणूस गेला, पब्लिसिटी हवी
माणूस येणार पब्लिसिटी नवी
त्यांच्या चिंतेसाठी नवी पाटी हवी
एकेकाच्या ओठावरती कशी नवी शिटी हवी
काय?
पब्लिसिटीची भीती हवी, तरी तिची मिठी हवी
लाचारीची रीत हवी
जगण्याला गती हवी
पब्लिसिटीची प्रीती हवी.
हे खर नाही काय?