गर्भरेशमी

गर्भरेशमी

.

खुणावते तुला दिशा
तेजस गोमटी
नजरेत किरणे तुझ्या
उद्याची नवी

घे निजून घे पाखरा
अंधार हा गर्भ रेशमी
का टोचती तुला चांदण्या
कापूस पिंजल्या बिछानी

घे पांघरून रे दुलई
मऊ उबदार मायेची
घे उशाला तुझ्या
अढळ चांदणी गगनीची

उजळता दिशा दिशा
घेशील उंच भरारी
क्षितिज पुढे पुढे तुझ्या
धाव दीर्घ रिंगणी

साठवून घे अंगी
जिद्द आकाश तोलण्याची
घे निजून घे पाखरा
अंधार हा गर्भरेशमी

स्वाती फडणीस ............... १६-०३-२००८