चटके

चटके

.

फडफडणार्‍या दिव्याला
पदराआड जपताना
पदरातली फुलं
थोडी काजळलीच

तेव्हा
फुलच गोंजारली
असतीस तर....
..................
कदाचित
कोमेजली असती
:
दिव्यावर पदर धरताना
फुलं अलवार जपत
किती ग.. भाजलीस!!

स्वाती फडणीस .................... १९-०३-२००८