गोजिरी...काल केबल वर लागल होता. मन सुन्न करणारा पिक्चर आहे....पिक्चरचा शेवट पाहू शकलो नाही...पण जे काही पाहिल ते मन सुन्न करण्यसाठी पुरेस होत. काही क्शण तर मला विशसच बसला नाही की असाही आजर असू शकतो.....रोज नवीन दिवस.... कालची एकही आठवण नाही..... रोज लहान बहिणिचा वाढदिवस साजरा करायचा..... जणुकाही वर्षातून एकदाच आलाय.
कशी असतील आश्या लोकांची आयुष्ये?...... स्वतःच्याच विश्वात गटांगळ्या खात राहिलेली.... ना ही कुठला भुतकाळ.... ना काही भविष्य. अश्या लोकांना बर करणाऱ्या संस्था जागोजागी तयार झाल्या पाहिजेत.
पण मग विचार आला.... ह्यांनी बरं होउन करायच काय? पुन्हा त्याच सुखाच्या म्रूगजळामागे पळायचं... आणि तिथे काहिच नाहीये हे पाहून निराश व्हायचं. आज निदान रोज वाढदिवस तरी साजरा करतात.....आनंदी आहेत स्वतःच्याच दुनियेत.... ना कालच्या जखमा लक्शात आहेत.... ना ही उंबरठ्याशी आलेल्या वादळांची काळजी!
हा विचार करतच रस्त्यावरून चाललो होतो..... वर काळ्या ढगांनी आभाळ भरलं होतं आणी खाली माझ मन!
दोन ढगातून एक तिरीप आली आणि ढगांच्या कडा सोनेरी झाल्या.