अमिबारावांचा "गवळ्याचे माप" हा कूटप्रश्न वाचून पूर्वी वाचलेला एक वेगळा कूटप्रश्न आठवला, तो असा :
१९, १३ व ७ लिटर मापाची प्रत्येकी एक अशा ३ बरण्या आहेत. पैकी, १३ व ७ लिटरच्या बरण्या पाण्याने पूर्ण भरल्या आहेत व १९ लिटरची बरणी पूर्ण रिकामी आहे. या तीन बरण्यांशिवाय इतर कोणतेही माप न वापरता १९ व १३ लिटरच्या बरण्यांत प्रत्येकी १०, १० लिटर पाणी ठेवायचे आहे. हे कसे करता येईल?
हा प्रश्न सोडविण्याची तार्कीक पद्धत मला सापडली नाही. परंतु एक संगणक आज्ञावली लिहून तो मी सोडविला आहे.