कवायत करताना,
एका सैनिकाचा चुकला ठेका,
कारण त्याला ऐकू येत होते,
अज्ञाताचे पडघम....
माझेही तसेच झाले..
एका सैनिकाचा चुकला ठेका,
कारण त्याला ऐकू येत होते,
अज्ञाताचे पडघम....
माझेही तसेच झाले..
इंद्रधनुषी कमानीवर बसलेल्या,
सोनेरी पाखरामागे धावत सुटले,
अन् फशी पडले; पदरी आलं..
पाय पोळत वाळवंट तुडवणं,
काया जाळत क्षितिज गाठणं,
माथ्यावर ऊन, पायांतळी रण,
घायाळ तन, घायाळ मन..
सोनेरी पाखरामागे धावत सुटले,
अन् फशी पडले; पदरी आलं..
पाय पोळत वाळवंट तुडवणं,
काया जाळत क्षितिज गाठणं,
माथ्यावर ऊन, पायांतळी रण,
घायाळ तन, घायाळ मन..
कारण, ते होते मृगजळ,
खोटे,फसवे केवळ......
खोटे,फसवे केवळ......