जीवन अपुले तृणपात्यासम
मृगशावक वदे मातेसी
जीवन अपुले मृगशावकासम (जीवन अमुचे मातेसम)
अजगर वदे पित्यासी (नर्स वदे डॉक्टरासी)
जीवन अपुले अजगरासम (जीवन अमुचे पित्यासम)
कारकून वदे बॉसासी (शिक्षक वदे विद्यार्थ्यांसी)
जीवन अपुले कारकुनासम (जीवन अमुचे बॉसासम)
चित्रगुप्त वदे यमासी (मुख्याध्यापक वदे पर्यवेक्षकासी)
जीवन अपुले चित्रगुप्तासम (जीवन अमुचे यमासम)
डॉक्टर वदे भूलतज्ञासी
जीवन अपुले डॉक्टरासम (जीवन अमुचे भूलतज्ञासम)
खाटिक वदे बोकडासी (बाबा वदे बाबीसी)
जीवन अपुले खाटकासम (जीवन अमुचे बोकडासम)
करवत वदे कुर्हाडीसी (मोलकरीण वदे मोलकरिणीसी)
जीवन अपुले करवतीसम (जीवन अमुचे कुर्हाडीसम)
बोकड वदे शेळीसी (दात वदे दाढांसी)
जीवन अपुले तृणपात्यासम
दोहों बोलती एकमेकांसी