अखंड गीत
.
काही पान वेगळीच असतात!..
झाडाची, वहीची, नात्यांची,
ती कधीच वाळत नाहीत..
ती कधीच गळत नाहीत..
हिरवी कंच राहतात कायम,
मनाच्या ओलाव्यात!
शीतल सावली धरतात..
हिरवेपणावर!
अन गीत उमटत जात..
अखंड,...जन्म जन्मांतरीच!
जन्म-जन्मां पल्याड,... अनंतापर्यंत!
ते गीत आदी आहे, प्रत्येक बोलाच!
ते गीतच आई आहे, प्रत्येक बाळाच!
स्वाती फडणीस...................११-०५-२००८
============================
आईपण जपणार्या प्रत्येकास
Happy Mother's Day.