(हे सर्व विनोद मी स्वतः लिहीले म्हणजेच अस्सल आहेत. म्हणजे कुठेही वाचलेले किंवा कुणीही सांगितलेले नाहीत. स्वतः विनोद बनवण्याचा हा पहिलाच प्रयत्न, कसा वाटला ते सांगा!!)
(१) एक सरदार काही कामासाठी बँकेत जातो. फॉर्म भरता भरता त्याला बँकेत एक सूचना लिहीलेली दिसते, " आपली तक्रार या पेटीत टाका." अचानक ते वाचून स्वतःचे काम अर्धवट टाकून तो बाजूच्या दुकानातून एक कोरी वही विकत आणतो आणि त्याच्या एका पानावर लिहीतो, " मला या बँकेविषयी काहीही तक्रार नाही." आणि त्या तक्रार पेटीत टाकतो.
(२) एक सरदार लंडनमध्ये जातो. तेथे प्रत्येक टिकाणी काळ्या रंगाच्या कचरापेटींवर लीटर (LITTER) लिहिलेले असते. ते पाहून तो विचारात पडतो, " अरेच्या! काय लोकं आहेत इथली? एक तर, पत्रपेटीला काळा रंग दिला आणि पत्राचे स्पेलींग (LETTER)चूकीचे लिहिले , आणि भरिस भर म्हणून त्यात पत्र टाकण्या ऐवजी कचरा टाकत आहेत! घाणेरडे कुठले!"