नको

पारख मला, भाळू नको
सोडून जा, टाळू नको

गात्रात शिशिराचा ऋतू
गजरा अता माळू नको

मी मोडल्या शपथा तुझ्या
तूही वचन पाळू नको

ना शक्य काही त्यातले
पत्रे जुनी चाळू नको

मी विझवले आहे मला
तूही जिवा जाळू नको

--------------------------------------

जयन्ता५२