- सावधान! हत्तीची रात्र आहे.
- आज येणार हत्ती
- तुम्ही हादराल
- हत्ती येईल तुमच्या टि. ही. मध्ये
- एक हत्ती रात्री ११ वाजता तुमच्या घरात येईल
(टि. व्ही. समोर बसलेले सगळे पाचई पास प्रेक्षक आहेत वाटते)
- आज तुमच्या टि. व्ही. मधून बाहेर येईल एक हत्ती
- तो आधी एक सोंड बाहेर काढील
- मग तुमच्या टि. व्ही. चा आवाज वाढवील
- आणि टि. व्ही. बंद करून टाकील
- तुम्ही मग आमचा कार्यक्रम पाहू शकणार नाही
- आहे ना गंम्मत?
- विसरू नका... रात्री अकरा वाजता... टि. व्ही. ऑन करा
आणखी एक प्रकार:
- आज रात्री अकरा वाजता ऐकू येणार एक आरोळी
- एक तेज आरोळी
- तुमच्या कानठळ्या बसतील.
- पण घाबरू नका
- टि. व्ही. बंद पण करू नका
- एक अशी व्यक्ती आमच्या स्टुडीओ मध्ये यणार..
- की तुमचे डोळे विस्फारणार
- विस्फारून विस्फारून पेंगणार
- पण झोपू नका
- जागे राहा
- बरोब्बर अकरा वाजता
- स्टुडीओत येणार एक सिंह
- डरकाळी फोडणार
- आमच्या खास प्रतिनिधीने पकडून आणलेला सिंह
- सिंहाशी बोलायचे असल्यास आम्हाला फोन करा
- बघायला विसरू नका : सिंह इज किंग ( ऑफ द जंगल! )
( ज्यांनी भाग एक वाचला नाही त्यांच्या साठी : आजकाल सगळ्या हिंदी मराठी न्यूज चॅनेल्सवर तळाशी ब्रेकींग न्यूज देतात. पण त्या जर सरकणाऱ्या (स्क्रॉलींग) नसल्यात तर आणि बातमीचे वाक्य खुप मोठे असेल तर त्या बातमीच्या वाक्याची कशी फोड ( की तोड फोड? ) केली जाते व त्यातून कसे विनोदी वाक्ये तयार होतात ते आपण वर बघितले. त्या फोडीतील पहिले वाक्य वाचल्यावर पूर्ण बातमीचा अंदाज येत नाही. कधी कधी असे वाटायला लागते की जागा उपलब्ध असतांनाही मुद्दाम उत्सुकता ताणण्यासाठी व प्रेक्षक जास्त काळ टिकून राहाण्यासाठी सुद्धा ही फोड केली जात असावी. एखाद्या खास कार्यक्रमाची जाहिरात अशी भन्नाट केली जाते की बस! आणि प्रत्यक्ष कार्यक्रम मात्र निघतो फुसका बार! )