मोरपिसारा

सरसर झरती धारा
पाण्यास कसा पहारा
पहा ओहोळ जरासे
ओलांडून जात किनारा

झुळझुळ झुळुक येते
गंधास वाहूनी नेते
नाव कुणाचे लिहितो
त्या गंधावर वारा

मेघांच्या माळा झुलती
घन ओथंबून येती
मनभर ऊठती वादळ
आठवणींचा मोरपिसारा