उसंत

(आधी प्रकाशन करताना काहीतरी चूक झाली...................................) चैतन्यची वसंत कविता आवडली, आणि वाचता वाचताच एक कल्पना सुचली, वसंत कवितेमधील "तू" म्हणजे मद्याची बाटली असे समजून..............

होती उसंत तेंव्हा आता उसंत आहे

 नाही समोरी तू, इतुकीच खंत आहे.

लोटीत सांजवेळी मिसळून प्यायचो ती

 ताडी उरात माझ्या अजुनी ज्वलंत आहे.

हातात भांग होती, डोळेही मस्त, ओले,

धुंद ओठांस आता, रुसणे पसंत आहे.

दिसताच माडी वरती पडल्या उड्या कितीक

अंगास वास येण्या, आता आता उसंत आहे?

सांगू किती किती मी गोष्टी वसनवेड्या

 माझ्या नशेत त्यांचे ओझे अनंत आहे