प्रेरणा : अनिरुद्धाने पाहिलेला ठिपका
घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला टाळणे जमले नाही
कळले नाही कसा कधी बेडीत अडकलो
प्रणयाराधन कधी संपले कळले नाही
आज अचानक पोर आपुला समोर आला
त्या धक्क्यातुन अस्मादिक सावरले नाही
तू पाठीला तिंबून माझ्या मऊ बनवले
पण पोळ्यांबाबतीत तुज हे जमले नाही
तशी जुनी पत्नीशी माझी ओळख होती
पण हेतुला तिच्या कसे ओळखले नाही ?
मान्य नेहमी करीत आलो की मी चुकलो
दोघांमधले अंतर त्याविण मिटले नाही
बदलत गेला बांधा अन मी बघत राहिलो
शेलाटा राखणे तुला का जमले नाही ?
तू जाताना नजर तुझ्या बहिणीवर पडली
का माघारी, हाय, तुला पाठवले नाही ?
पळत राहिलो दूर तुझ्यापासून नेहमी
लग्नावाचून कधी कुणाचे अडले नाही