हरी आला हरी मनाचिये घरा । हरिद्वार सारा देह झाला ॥
बैसविला प्रेमे हृदयकमळी । तेथोनिया मुळी, उठू न शके ॥
देह हरिद्वार झालासे एकदा । त्याची चिंता कदा होत नाही ॥
माझी एकतारी, बोलतसे हरी । माझा रे कैवारी, कोण दुजा? ॥
रंगले भजनी अहर्निश त्याच्या । माझिया सख्याच्या, प्रेमानेच ॥
भोवती माझ्याच वसतो सदाचा । होऊन तारेचा नाद नित्य ॥
आता त्यालासुद्धा नाही करमत । म्हणौनी रमत, एकतारीत ॥
आता माझे काही, माझ्याकडे नाही । याची देतो ग्वाही श्याम स्वये ॥
मीरा के प्रभु, गिरिधरनागर । एकतारी जागर करी सदा ॥