रे मना...

माझ्या मना सावर
हा उंच जाणारा झूला,
पुढच्या क्षणी खाली येताना,
भोवळ येईल ना मला...

अवखळपणे धावतोयस
या ओढाळ पाउलवाटेवरती,
नजर तुझी नक्षत्रमण्यांवर,
पण,  काटे पायांखालती...

थांब जरासा,  हात धर माझा,
सावर तुझा तोल,
जरासाही ढळलास तर,
दुनिया लावेल बोल........