...... न ऐकायचे (२)

 ठरवले मनाचे न ऐकायचे
    मुली छान दिसताच भुंकायचे  (हा हायब्रीड म्हणजेच डॉगशेर आहे)

सखी ही कशी साबणासारखी
   तिला सुळ्ळकन निसटता यायचे

किती तळघरे तळघरामागुनी
  न 'दाऊद'ला आत शोधायचे

कसे प्रेम करतात शिकवेन मी
  कधी ना मला चूक ठरवायचे

नवे ना घडे तेच ते तेच ते
  कसे बायकोलाच बदलायचे

'कसं चाललंय' जर विचारे कुणी
   अडचणीच सांगून पिदवायचे

नको सत्य सांगूस सगळे मला
   तुला फास द्यावाच.... वाटायचे

किती गर्व, हव्यास अन वल्गना
  घरी कपबशा रोज विसळायचे