प्रसूती

रात्रीच्या अधरावर जेव्हा अधर अधीरे मी ठेवियले

काळालाही गर्भ राहिला आणि उद्याचे किरण प्रसवले

त्या किरणाची शय्यांसोबत अजून माझे प्राक्तन करिते

वांझोट्या अन शब्दामधुनी रोज नवीन ते गीत प्रकटते

अशोककुमार