'क्षितिज'
एक भासमान रेषा,
जिथे आभाळ आणि जमीन यांच मिलन होत,
असच, एक क्षितिज
तुझ्या माझ्या प्रेमाच,
जिथे तुझ्या माझ्या मैत्रीचं नात बदलत,
जिथे तुझ्या माझ्या नात्याला प्रेमाच रूप येत,
जिथे कल्पनेला वास्तवतेचं रूप मिळत,
खरंच???
कल्पना वास्तवात उतरते का?
सगळी स्वप्ना खरी होतात का?