चाल : "देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा... "
फाटक्या विजारी, बटणहीन लेंगा
घेतलास का रे, मूर्खा, बायकोशी पंगा? ॥ध्रु॥
असे खास भितींवरला आरसा टपोरी
तरी लाज सोडून बाया उभ्या त्यासमोरी
तास तास पतिराजांना दाखवून ठेंगा ॥१॥
पिते दूध रत्तल रत्तल माय बायकोची
सुरस त्याहुनीही आहे कथा सासऱ्याची
जावयाघरी दारूची उपसतोय गंगा ॥२॥
काय मेहुण्याची सांगू थोरवी तुम्हाला
काल त्यास पोलीसांनी तडीपार केला
चंट मेहुणीच्या मागे लागतात रांगा... ॥३॥