उत्तरायण

ह्या देहामधुनी कधी उमलती गाणी
कधी झरझर झरते नयनामधुनी पाणी
हा देह दावतो काम, क्रोध अन मोह
आगर पुण्याचे वा पापाचा डोह !

हा देहच दिसतो, कधी दिसेना आत्मा
वलयात गूढ जणू दडलेला परमात्मा
हा देह दावतो सत्त्व, तत्त्व अन माया
हा देहच रचतो ब्रम्हांडाचा पाया !