रोषणाई

ही कशाची रोषणाई ?
पेटले हिंदू-इसाई

मौलवी, पाद्री नि पंडित
आंधळे सारे कसाई

एक माझा मार्ग साचा
ही मनाची रोगराई

कवचकुंडल झापडांची
अन् विचारांना मनाई

मंदिराबाहेर चोखा
गाढ निजलेली विठाई

काल होती मोगलाई
आज उत्तर-पेशवाई...