काल पाहीले मी
चांदणे भर दुपारी
कानाखाली त्याने
वाजविता तुतारी
शब्द शब्द ही मी
पुरता न वाचलेला
घेऊनी गेला त्याचा
पेपर तो शेजारी
सारेच जवळचे आता
जाहले मज परके
जो भेटतो तो
मागतो जुनी उधारी
मी मैफलीत त्याच्या
टाळले जाणेही माझे
कोणीतरी म्हणाले ते
माझ्यासम भिखारी
सप्तपदी सुखाचे
होते दिले वचन
ती पाहते टिव्ही
अन मी राबता बिगारी
तु दिलेले सारे
सांडून दान गेले
विसरलो ठिगळाचे
मम फाटक्या विजारी
शोधून सापडेना
नकाशात मज देश
रापुनी त्यास ढेकर
देती सारे पुढारी
अणू रेणुत ईश्वर
संत सांगून गेले
२५ फुटाचे गणपती
बसवितात पुजारी