.................................
एकटेच आपले....!
.................................
एकटेच आपले इथे असायचे...!
एकटे रडून, एकटे हसायचे...!
एकटीच एकटेपणातली व्यथा...
एकटीच एकटेपणा, तुझी कथा...
ऐकण्यास भोवती कुणी नसायचे...!
एकटेपणा तसा मला कुठे नवा?
एकटेपणा सदैव हा मला हवा...
पांघरून एकटेपणा बसायचे...!
एकटेपणाच फक्त सोबती खरा...
एकटेपणाच फक्त हा मला बरा!
एकटेच यापुढे मला वसायचे...!
- प्रदीप कुलकर्णी
.................................
२५ नोव्हेंबर १९९८
.................................