अताशा तुजसाठी काही
लिहावेसे वाटते,
पुन्हा माझ्या डोळ्यांना स्वप्नम
पाहावेसे वाटते.
हात तुझा हाती घेउन
चालावेसे वाटते,
मनाचा अबोल कप्पा खोलून
खुप बोलावेसे वाटते.
तुझ्या सोबतिने सारं
विसरावं वाटते,
बोटांमधल्या रित्या जागांना
तु येउन भरावं वाटते.
जयेन्द्र.