मिळे मला जर,मिळे तुलाही... वाट पहा
उगवतील बघ, दिशा तुझ्याही... वाट पहा
मनास म्हणतो, येइल बघ ती खात्रीने
एक जन्म हा इतका नाही... वाट पहा
कोणापाशी वेळच नाही, काय करु?
पुंडलिकाच्या देवालाही... वाट पहा
श्वास घ्यायचे हाती असते, करायचे
करू नको तू दुसरे काही... वाट पहा
लोकशाहिचे वर्ष पाचवे,नंतरची
तुझीच राजा, राजेशाही... वाट पहा