सांगायचे ते राहून गेले...

हितगुज सारे संपले तरी... सांगायचे ते राहून गेले

नकळत सारे कळले तरी... समजायचे ते राहून गेले

फिरून झाल्या दाही दिशा... शोधायचे ते राहून गेले

अडखळलेल्या पावलांना... सावरायचे ते राहून गेले

शब्दाविना सूर मैफलीतले... छेडायचे ते राहून गेले

श्वास थोडा उरला तरीही...  अजून जगायचे ते राहून गेले

(ओळी संपल्या पानांवरती.. लिहायचे ते राहून गेले... )