मी असाही..

दोष दुनिये तुझे
मोजतो मी का हे?
आहे तुझ्यात मी..
विसरतो मी का हे

कोण जाणे सवय
लागली मज कशी
दु:ख इतरांचे
दिसता.. वळे कुशी
'आपलेच खरे'
पाडे पुन्हा फशी

'बोलावे' म्हणून
बोलतो मी फुका
कर्तव्यशुन्य मी..
काढतो बस चुका
'बदला' 'बदलूया'
सोडतो न हेका

सारे कळते पण
वळती ना या कळा
तांड्यात गुरांच्या
चालतोय आंध़ळा
कुपीच्या बेडका
असे कुपीचा ल़ळा