भरती-अहोटीच येणं

भरती-अहोटीच येणं

=====================

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
लाटांच्या झुल्यात.. मनाच झुलणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
रेतीच्या किल्ल्याचं.. सागरी बुडणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
विखुरती चांदी.. हलकेच झेलणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
उमटल्या खुणांच.. तळाशी राहणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
खाऱ्या लोटात.. खळाळून हसणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
लाटांच्या ओठी.. गाज असणं..!

=====================
स्वाती फडणीस.................... २००६