वाटले होते पुन्हा एकदा बात रात्रीची झडेल,
वाटले होते पुन्हा एकदा तो मखमली कप्पा उघडेल;
वाटले होते पुन्हा एकदा सडा प्राजक्ताचा पडेल,
वाटले होते पुन्हा एकदा सफर स्मृतीवनाची घडेल ॥
पण आस लावून गुडूप व्हायचे व्रत तू सोडले नाहीस
अंतराच्या या दगडराशीला पाझर तू फोडले नाहीस;
फुटक्या कपाळावरचे तुटके नशीब तू खोडले नाहीस
कमळमुळांचे जीवघेणे हे गुंते तू तोडले नाहीस ॥
जळत्या आभाळी वणवण घिरट्या घालित मी बसेन
आणि मधूनच त्या आठवणीने लपून-छपून हसेन ॥॥