छे, कधी म्हणालो मी खरा आहे
अजूनही माणसात मी जरा आहे
नाहीतरी ही दुनिया खोट्यांचीच
इथे सत्याचा आवाजही कापरा आहे
दिवसा कसाई सारखा वागलो तरी
रात्री सौ. च्या हाताचा बकरा आहे
म्हणे लक्ष्मी जिथे, तिथेच ती नांदते
अरे पैश्या तुझाही किती नखरा आहे
कोण म्हणला मी बायकोच्या मुठीत
अहो नुकताच जन्मलेला नवरा आहे
@ सनिल पांगे