कोलाज

कोलाज

एकेक रंग
एकेक रेषा
एकेक आकार
जोडतेय...
अनंतकाळ...
चित्र नाही
निदान
कोलाज तरी....?

    ***

थोडा बेभान वारा
थोडा उधाण सागर
थोडा रिमझिम पाऊस
थोडे काजळकाळे ढग
थोडे श्रावण उन्ह
आणि थोडेसे सूर... विखुरलेले...
कोलाज पूर्ण...!