अजून ही

अजून ही
विश्वास बसत नाही मला
की तू
या जगात नाहीयेस
लाखदा विचर केला तरी
तु नसल्याचं
कडवं सत्य
वास्तव कबूल करतं
माझ्यासाठी हा प्रसंग
हृदयाला चटका लावून जाणारा आहे रे
तू मला सिगारेटचा चटका
दिला असतास तर मी एकवेळ सहन केलं असतं
पण तुझं नसणं तर
त्याहूनही वेदनाकारक आहे
तू आहेचा होता म्हणायला जड होते जीभ
अंग थरथरू लागतं....
आणि स्वर जड.............
तरीही
तुझ्या अस्थित्वाच्या पाऊलखुणा
जागोजागी, पावलोपावली दरवळताना दिसतात
तु असल्याची,
माझ्या आसपास फिरकण्याची चाहूल सहज देऊन जाते
तुझ्या आठवणींच्या रुपात
एकदा तुला विसरण्याचा वेडा प्रयत्न केला
नि आता तूच
माझ्यापासून एवढा दूर निघून गेलास
मला ही न कळवता
तुला भेटण्याची किती इच्छा होती तु आजारी असताना
तू बरा होशील
मला आनंदाने भेटशील
भेटींवर भेटी घडत राहतील
अशी आशा वाटत होती
पण तु तर......
एवढा आजारी असशील याची किंचित कल्पना ही दिली नाहीस
माझ्याशी बोलताना
तुझ्या वेदना ही जाणवू दिल्या नाहीस
मग मला कसे रे उमगणार
तू माझ्यापासून दूर जाशील ते.................
अजुनही
विश्वास बसत नाही.