(अशीही एक) कोजागिरी

आलेत एकाच दिवशी पूर
चांदण्यावरच्या कवितांचे
चंद्र, भरती नि शब्द - भलतेच
गेलेत वरती म्हणायचे!

कोजागिरीला हवा कशाला
बिलियन्स चा बेल-आउट?
******************
मिळतील तितके चंद्र घालून
बांधल्या असत्या कित्येक भेळी
भरतीपण मग आली असती
सांगेन तश्शी - नेमक्या वेळी

भेळवाला बघा मराठी,
'भैयाची भेळ' आउट!
*****************
दाट सायीच्या पडद्याआडून
गोड चेहरा दिसला असता
(हाती ग्यालन 'फॅट-फ्री'चे, अन
विचारसुद्धा पातळ नसता)

कुण्याकाळची याद कुणाची
छळे अशी थ्रूआउट
*****************