ग्रिष्माची ती अतिदाहकता
जाळून टाकी प्राणीमात्रा
पावसाची एक सर बरसता
क्षणात येई आल्हादकता
पा़ऊस आला पाऊस आला
सर्वांना भिजवून गेला
झाडे, वेली, पाने, फुले,
गाऊ लागती आनंदी गाणे
पाऊस ओला, पाऊस हिरवा
स्रुष्टी गाते एक मारवा
पाऊस थंडी, पाऊस धुकं
स्रुष्टीला त्याचं किती कवतीकं
हिरवी शेतं, हिरवी रानं
डोळ्याचं फेडती पारणं
डोंगरावरती हिरवी दुलई
आकाशी इंद्रधनू झिलई
हिरवे डोंगर, वाहती निर्झर
तारुण्याला येई पुन्हा भर
नदी, नालेही भरून वाहती
सागरा मिळण्या अधीर असती
आला श्रावण, गेला श्रावण
भादव्यातले संपले सारे सण
वेद लागले जाण्याचे
वेळी अवेळी बरसण्याचे
पावसातले नक्षत्र हस्त
पाऊस येई गाठून सूर्यास्त
कधी कुठे, कधी किती
वेळी अवेळी पडत जाई
गेला गेला म्हणताना
गर्जत तो येई पुन्हा
गडगडाट अन विजांचे तांडव
भिजून जाती सारेच जीव
शेवटचा तो पडला पाऊस
दिसे न त्याचा काही मागमूस
गेला तो कायमचा आता
वर्ष भराची पुन्हा प्रतीक्षा