सावली...

मुखवट्याआडची तुझी मुद्रा, जगाला कुठे दिसली?
तू मोठा शहाणा, मोठी तुझी सावली,
तुझ्या सावलीत माझी प्रतिमाच हरवली...

उसळून बाहेर पडले, तुझ्या सावलीतून,
तेव्हाच खऱ्या अर्थी समजून चुकले,
तुझ्या सावलीतच किती जास्त होरपळले...

होरपळायचेच जर आहे तर, राहीन उन्हातच,
सोसेन चटके,  पण, माझी मीच होईन सावली.
माझा रस्ता दाखवेल मला माझ्या हातातली दिवली..