सख्‍या...

रेतीवर तुझ्या माझ्या
पावलांची नक्षी,
क्षितिजाच्या पल्याड उडणारे
आठवणींचे पक्षी....

काळ तयारच असतो
पावलांची नक्षी बुजवायला....
इतका वेळ का लागतो मग,
मनाच्या जखमा बुजायला??...