मखमली गाणं

मखमली गाणं
=======================

पापणीत ओल
अलवार जपणं
मन पिसाऱ्यात
मखमली गाणं

पायासंगे पदरव
मुक्याने बोलणं
देहाला चार हात
साथीने जगणं

नजर पाळण्यात
स्वप्नांच डोलणं
इवलंसं आकाश
पंखावर तोलणं

========================
स्वाती फडणीस..... ०५-११-२००८