पाचोळा...

काळी वेदना.
सावलीत लपली,
उजाडल्यावर..

डोळ्यातलं पाणी,
खेळायला गेलं,
दवाबरोबर..

फुलांचे नि:श्वास,
उडून गेले,
मारताच फुंकर..

सुगंधाची कुपी,
दूरवर उधळली,
हसण्याबरोबर...