तुझ्या वाटेवर आज

नयनात रेघिले
तुषार लाजेचे थेंब
धुंद रोमांच तरळले हळुवार
तुझ्या वाटेवर आज

अकल्पित क्षणातल्या
खुणावल्या मिठीत
तरंग उठले सहज..... तुझ्या वाटेवर आज

तुझा गोड सहवास
करी जवळ अधिक मला
धुंदावल्या मनाला करी बेभान आज

थरथरणाऱ्या शब्दांचे बहाणे
दाठल्या भावना बेबंद करी शब्द आज

हळुवार.. अलगद स्पर्शातल्या
नि:शब्द वेदना नाहीसे करील आज
नयनात रेघिले
तुषार लाजेचे थेंब
धुंद रोमांच तरळले हळुवार.. तुझ्या वाटेवर आज.....