आई
घरट्यातल्या चिमणे,
अंधारात चमकणाऱ्या तुझ्या डोळ्यातील मण्यामध्ये
खिन्नता ती पाहिली
की मला माझी आईच आठवते..कापडावर घरटे विणणारी माझी आई..
ज्यांची मुले खूप दूर निघून गेली आहेत अशा
सर्व आयांचे दु:ख तुझ्या डोळ्यात आहे
शेवटी सगळ्या आयांनी
कपाळी तेच लिहून आणलेले असते का ग?
तुझ्यासारखेच सोबतीला एक रिकामे घरटे?
आणि
विणलेले धागे बघत राहणारे डोळे....