आई

आई
घरट्यातल्या चिमणे,
अंधारात चमकणाऱ्या तुझ्या डोळ्यातील मण्यामध्ये
खिन्नता ती पाहिली
की मला माझी आईच आठवते..
कापडावर घरटे विणणारी माझी आई..

ज्यांची मुले खूप दूर निघून गेली आहेत अशा
सर्व आयांचे दु:ख तुझ्या डोळ्यात आहे

शेवटी सगळ्या आयांनी
कपाळी तेच लिहून आणलेले असते का ग?

तुझ्यासारखेच सोबतीला एक रिकामे घरटे?
आणि
विणलेले धागे बघत राहणारे डोळे....