कोकिळेची पिले/ कावळ्याच्या घरी/
सुखाने वाढती / आनंदाने /
कावळीची माया / समतेने पाही /
आपपरभाव / मुळी नाही /
कुंतीचे ते बाळ/ राधा सांभाळिते /
राधेय म्हणोनी / मिरविते /
देवकीचा पुत्र/ यशोदेच्या हाती/
यमुनेच्या जळी/ खेळतसे /
माद्रीची छकुली / कुंतीने पोशीली /
पाचांची एकता / साधियेली /
मायावती पुत्रा / गऊतमी जोजवी
सिद्धार्थाच होई / गौतम बुद्ध/
धाराऊच्या दुधा / संभाजी जागला
देहही अर्पिला/ धर्मकार्यी
किती सांगू कथा / कावळी मातांच्या/
वंदीन चरणा / वारंवार/