माझी मैतरीन

माझी मैतरीन आहे, मोठी दिसाले साजरी

कधी वाटे बेशरम, कधी जगाची लाजरी!

बोलतेत जशी भाट, चुप राहे जशी मुकी

टावर वाटे उभेपनी, अन चालता पालकी!

फॅशनही बाप्पा तिची, रोज बदले सारखी

कधी होतो म्हणे स्लिम, कधी अजून बारकी!

तसा स्वभाव सरळ, जशी नागमोडी वाट

मध्यरात्री तिले उन्ह, दिसे दुपारी पहाट!

अहिन्सात जशी वाहे, तिच्या नसानसामंधी

नाही भेत मरणाले, उवा तिच्या केसामंधी!

नाही येवढेच गूण, आहेत अजून अनेक

असो कशी माह्यासाठी, आहे लाखामध्ये एक!!