हे अस्तित्वाचे देणे
मी देऊ लागलो आता
मालवून क्षण तो पुढला
शतरंगी सजणे येना ...१
हा विदेह बघ मी झालो
निर्बंध-मुक्त तू होना
ही शांत समाधी माझी
लय-पूर्ण त्यात तू होना ...२
आरपार सखये होऊ
किती आत्मिक ही तन्मयता
शून्यात तुझ्या मी पूर्ण उमलतो
हे नृत्य निरंतर होता.... ३
हि कविता माझी नाही
हे अस्तित्वाचे देणे
कुणी न उरले कुणा मध्ये ग
हे असे निरंजन जगणे... ४