आठवण तुझी येता मनी
मिच मजला हरवून बसतो
मनातून उलटून मग
एक शब्द करतली उमटतो
कुरुवळूनी मग त्या शब्दास
मी खुप वेळ स्वतातच रमतो
भान हरवतो स्वतचे
आणि जगालाही विसरतो
तो शब्द माझ्याकडे बघून
गोड गाली हसतो
चिडवून थोडे मजला
तो मात्र मजा घेतो
त्या शब्दास चुंबिता
मी हर्षून जातो
तुझ्या चुंबनाची मोहीनी
क्षणभर अनुभवून घेतो
बघता बघता
एक अश्रू नयनामध्ये येतो
तुझ्या सोबतीच्या आठवणींना
स्वतामध्ये सामावून घेतो
ढळता मग तो अश्रू
मी करतली झेलतो
तुझे लोभस रूप
त्यामध्ये न्याहाळत बसतो