धुक्यात बुडलेल्या पहाटे
स्वप्नांची एक एक पाकळी
विलग होत जाते
आणी स्वच्छ रविकिरणात मात्र
स्वप्नांचे जग अंधारत जाते
कोवळी उन्हे
अंगावर घेवुन
गवतपत्रावरील हसणार्या दवबिंदुकडे पाहुन
मला सहजच वाटते
यांना सुद्धा पडत असतील
पहाटेचे स्वप्नं
सत्यात येण्यासाठी धडपडणारी
आणी खरोखरच ..............
एक मिश्किल प्रश्नसुद्धा मनी येतो
त्यांची स्वप्नेही काय असावे
ज्यांचे आयुष
एका स्वप्नाहुनही लहान असते..................?