जिने वेधली नजर नजर ती साधी नाही, सहजा सहजी सापडेलसा मीही नाही .
आहे त्या नजरेत निराळे खासच काही, अशी बान्धते तिथून परतिची वाटच नाही.
किती अचानक घडले अघटित रुजले डोळे,नावनिशाणी मी असल्याची उरली नाही
ध्यास तोच भासही तिचा ती मी झालेली,मी माझेपण दिले वाहुनी तिच्या प्रवाही