चांदण्यांच्या पावलांनी चालण्याचे ,दिवस सरले लोचनांनी बोलण्याचे.
मंदसा काळोख सळसळ पिंपळाची
सांजवेळी मंदिराच्या पायरीशी, जे दिले नी घेतले ते हरवल्याचे १
निवडता येते कधी का सांग नाते
भेट होते त्या क्षणी अवघे हरवते, शोधता तळठाव सारे उधळण्याचे.२
भय किती डोळ्यात ओठी शब्द नाही,
उष्ण तळवा केवढा तो कंप ह्रुदयी, स्पर्शभाषेतील पहिल्या अक्ष्ररांचे३
आत नि बाहेर पाऊस वाजताहे,
अजुनही मन धावते क्षण मोजताहे,वाहत्या धारेत होडी सोडण्याचे४