विडंबन असल्यामुळे काही इंग्रजी शब्द वापरले आहेत.
देशाची तिजोरी व्यक्तिचाच ठेवा
यास चार मेवा आता त्यास चार मेवा
गिळे लाच डोळे मिटुनी जात भाजपाची
मनी चोरट्यांच्या नाही भीती कॅमेऱ्याची
सरावल्या मोदीलाही कंप का सुटावा
यास चार मेवा आता त्यास चार मेवा
स्वार्थ जणू भिंतीवरती टांगतोय राणे
आपुलिच सेना कधि, तर सोनियाप्रमाणे
घडोघडी पद ना मिळता पक्ष त्यागवावा
यास चार मेवा आता त्यास चार मेवा
मी कधी मराठी होतो, वाजवा तुतारी
छगन, नारू, पुतण्या गेला, काय ही शिसारी
कसा हा पसारा पोरा आज वाढवावा?
यास चार मेवा आता त्यास चार मेवा
मुख्यमंत्री होतो तेव्हा लाटले भुखंड
आज खात आहे पुतण्या एकटा श्रीखंड
राष्ट्रवाद घ्या हो कोणी राष्ट्रवाद घ्यावा
यास चार मेवा आता त्यास चार मेवा
लोक फार झाले येथे युपी अन बिहारी
आळशी मराठ्यांना बस, मीच हाक मारी
पण कुणी आधी माझा हा जेल थांबवावा
यास चार मेवा आता त्यास चार मेवा
नॉमिनेट नवरा झाला सासु वारल्यावर
आणि माझि ओटी भरली स्वतः वारल्यावर
सोनियाचा दिन इटलीला मीच दाखवावा
यास चार मेवा आता त्यास चार मेवा